- प्रीती जाधव-ओझा पुणे : काही एड्सग्रस्त रुग्ण उपचार अर्धवट सोडून देतात किंवा उपचारच घेत नाहीत. अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यासाठी राज्य एड्स नियंत्रण संस्थेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत संबंधित रुग्णांचे समुपदेशन करून नियमित उपचार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये आतापर्यंत ३८८ रुग्णांची रुग्णालयात नोंदणी झाली, पण त्यांच्यावर उपचार करता आले नाहीत. या मोहिमेत या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.राज्यातील तीन वर्षांतील एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या जवळपास सहा हजार इतकी आहे. मात्र, अनेक रुग्ण जिल्ह्यातील अॅन्टी रेट्रोव्हायरल (एआरटी) केंद्रात नाव नोंदवून नंतर पुन्हा केंद्राकडे फिरकत नाहीत. या मोहिमेंतर्गत जे एचआयव्हीग्रस्त रुग्ण उपचारासाठी ए.आर.टी. केंद्रात गेले नाहीत, केंद्रात नावनोंदणी करून पुन्हा आले नाहीत किंवा औषधे घेणे मध्येच सोडून दिले आहे, अशा रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. रुग्णांचे संपर्क क्रमांक, पत्ते शोधणे, गृहभेटीद्वारे रुग्णांपर्यंत पोहचणार आहेत.सीडीफोर तपासणीची अट रद्दएखाद्या रुग्णाला एचआयव्ही असल्याचे निदान झाल्यानंतरही जर त्याचा सीडीफोर काउंट (शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण) पाचशे किंवा त्यापेक्षा कमी असल्यावरच त्यावर उपचार सुरू केले जात होते. या अटीमुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही अट आता रद्द करण्यात आली आहे.क्लस्टर अॅक्टिव्हिटीजिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांची संख्या पाहता जिल्हास्तरावर ब्लॉक वाईज आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडा तयार करून अतिजोखमीच्या ठिकाणी जनजागृती तसेच समुपदेशन व तपासणी करण्यात येत आहे.सदर क्लस्टर अॅक्टिव्हिटी पुणे महापालिका तसेच पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात आयसीटीसी, एनजीओ व आरोग्य क्षेत्रातील संस्थांमार्फत राबविली जात आहे व त्यातून सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले आहे.या मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वेळ पडल्यास या क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘विहान’सारख्या या क्षेत्रात विशेष काम करणाºया स्वयंसेवी संस्था या मोहिमेत पुढाकार घेत आहेत.मोहिमेमध्ये २०१४-१५ ते जून २०१८ पर्यंत उपचारापासून लांब राहिलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जात आहे. आयसीटीसी व विहानमार्फत या रुग्णांना एआरटी केंद्राकडे संदर्भित करण्यात येत आहे.-डॉ. ए. बी. नांदापूरकर,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध, पुणेउपचार सुरूच न केलेलेकिंवा बंद केलेल्या एड्सग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना या उपचाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे ही मोहीम महत्त्वपूर्ण असून, चांगले यश मिळत आहे.- बालाजी टिंगरे, जिल्हा पर्यवेक्षक,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागपुणे जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांची संख्या पाहता जिल्हास्तरावर ब्लॉक वाईज आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये उपचारापासून लांब राहिलेल्या रुग्णांमध्ये ३८८ रुग्णांचा समावेश आहे. त्या सर्वांची इत्थंभूत माहिती संबंधित आयसीटीसी केंद्राकडे उपलब्ध असून त्यानुसार त्यांचा शोध तेथील स्थानिक पातळीवर घेतला जात आहे. त्यातून जून व जुलै महिन्यात एकूण १६३ रुग्णांचा शोध लागला आहे.
‘त्या’ एड्सग्रस्तांना मिळतेय नवसंजीवनी; राज्य एड्स नियंत्रण संस्थेची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:44 AM