गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा- कन्हैया कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 08:00 PM2021-12-09T20:00:56+5:302021-12-09T20:39:20+5:30

पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसे काय होते? असा प्रश्नही कन्हैया कुमार यांनी यावेळी केला...

'Those who believe in Gandhi should join Congress, those who believe in his assassination should join BJP' - Kanhaiya Kumar | गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा- कन्हैया कुमार

गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा- कन्हैया कुमार

googlenewsNext

पुणे: काँग्रेसचे चरित्र या देशाचे चरित्र आहे. एकाच बागेत अनेक रंगाची फुले फुलवण्याचा विचार आहे हा. या देशात अतिवाद चालत नाही. सध्या ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये या असं आवाहन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले, नेतृत्व तोच पक्ष करेल ज्याला देश समजेल. ज्यांनी रेल्वे नाही बनवली, ज्यांनी बीएसएनएल नाही बनवले ते एका सेकंदात या कंपन्या विकणारच. ज्यांनी बनवले तेच या कंपन्या वाचवणार. एक बडबोला माणूस अर्ध्या रात्री ऊठून बोलेल तर देश वाचणार नाही तर विकणारच. गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा, असं कन्हैया कुमार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, मोदींना पर्याय काय विचारता? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही. सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही. पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसे काय होते? असा प्रश्नही कन्हैया कुमार यांनी यावेळी केला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहाचा समारोप कन्हैयाकुमार यांच्या प्रमुख ऊपस्थितीत गुरूवारी सायंकाळी काँग्रेस भवनच्या आवारात लोकशाही बचाव सभेने झाला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शहराध्यक्ष रमेश बागवे, सप्ताहाचे संयोजक प्रदेश ऊपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर ऊपस्थित होते.

काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्वागत केले. मोहन जोशी यांनी प्रास्तविकात भाजपावर टीका करत जनतेचा आता मोदींवरचा विश्वास ऊडत चालला असल्याचे सांगितले. सभेच्या सुरूवातीला हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले तिन्ही सेनादलांचे प्रमूख जनरल बिपिन रावत व अन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: 'Those who believe in Gandhi should join Congress, those who believe in his assassination should join BJP' - Kanhaiya Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.