शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

विद्यापीठात फिरायला येणाऱ्यांनो, आधी दरमहा हजार रुपये जमा करा; तरच प्रवेश मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:50 PM

ऑक्सि पार्क योजना जाहीर :  कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले परिपत्रक; तीव्र विरोध होण्याची शक्यता

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिरायला येणाऱ्यांना आता दरमहा एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबाबत आधी शुल्क जमा करा, तरच विद्यापीठात प्रवेश मिळेल, असे स्पष्ट केल्याने पुणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले. त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विद्यापीठाच्या ४११ एकर परिसराचा विहार करण्याचा आनंद घेता यावा यासाठी विद्यापीठाने 'SPPU OXY PARK' योजना जाहीर केली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे या योजनेची प्रत्यक्ष अमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र, शुक्रवारी (दि.११) रात्री उशिरा याबाबत कुलसचिव डॉ. पवार यांनी परिपत्रक काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येत्या २१ जूनपासून योजना लागू करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.

विद्यापीठात अभ्यागताना सकाळी आणि संध्याकाळी फिरायला यायचे असेल तर आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक हजार रुपयांचा धनादेश सुरक्षा विभागाकडे कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे सदस्यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला शुल्क न भरता प्रवेश हवा असेल तर तसा प्रस्ताव द्या, व्यवस्थापन समिती त्यावर चर्चा करून निर्णय घेईल, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.------निर्णयाला तीव्र विरोध होणारविद्यापीठाने परिपत्रक काढल्यानंतर पुणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थी संघटना बरोबरच पुणेकरांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ