पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ''अमित शाह आणि भाजपाची वाटचाल” या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते बालगंधर्व सभागृहात पार पडले. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिलांमध्ये जोरदार राडा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलेला मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर टीका केली आहे.
पाटील म्हणाल्या, वैशाली नागवडे आणि महिला या स्मृती इराणी यांना निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घालून महिलांना मारहाण केली. त्यांनी आता आपली संस्कृती दाखवली आहे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. नालायक, नीच लोकांनी महिलेवर हात उचलता, कंठण तोडले, मारहाण केली. ज्यांनी आमच्या भगिनींवर हात उचला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी करार जवाब देंगे असं त्या म्हणाल्या आहेत. विनयभंगाचा गुन्हा दाखल
बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.