पुणे : पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आहे. पुण्यात जरी शिवसेनेला जागा मिळाल्या नसल्या तरी याचा अर्थ पुण्यात शिवसेना संपली असा नाही. शिवसेना पुण्यात कायम असणार आहे. असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले.पुण्यात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावेळी भाजपचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे गोऱ्हे म्हणाल्या की, युती मध्ये मतभेत असले तरी मतभेद नाहीत. याचे कारण म्हणजे चंद्रकांतदादा. महायुतीचे नेते पाठीत खंजीर खुपसणार नाहीत, याची सामान्यांना खात्री आहे. युती सरकारच्या काळात 55.29 टाक्यांनी गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण युती वाढले आहे.
दरम्यान, युती मध्ये पुण्यात शिवसेनेला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. कसब्यातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगण्यात उतरले आहेत.