पुणे : देशातील सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांसह नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत सरकारची ढवळाढवळ वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार या संस्थांवर लादले जात आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सरकारवर हल्लाबोल केला. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा आवाज संसदेत उठविला जाईल, असे सांगत मी नेहमी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खा. राहुल गांधी एफटीआयआयमध्ये आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर, चिरंजीवी, अभिनेत्री खुशबू, रमया, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले, आरएसएसची विचारसरणी सध्या सगळ्या शैक्षणिक संस्थावर लादली जात आहे. देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही सुरू आहे. चौहान यांच्यासाठी मोदीच आग्रही आहेत. त्यामुळे त्यांचा हा आदेश डावल्याची हिंमत कोणीही दाखवत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून स्वत:चे विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.प्रतिनिधी) भाजपाची निदर्शने..राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच बाहेर एफटीआयआयसमोर भाजपसह पतित पावन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्याचवेळी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय) च्या कार्यकर्त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादले जाताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2015 4:59 AM