पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात संचेती हॉस्पिटलमधील डॉ़ केतन खुर्जेकर यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, महामार्ग पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात द्रुतगती महामार्गावर १५ हजार मोटारी व अवजड वाहनांवर लेन कटिंग केल्याबद्दल कारवाई केली आहे.या वर्षी जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान पुणे विभागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७४ हजार १४६ वाहनांवरकारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख २१ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे, असे वाहतूक महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.महामार्गावरील व शहरांतील मार्गांवरून वेगाने गेल्याने होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांना इंटरसेप्टर व्हेइकल देण्यात आली आहेत. राज्यातील पोलिसांना सध्या अशी ९६ वाहने देण्यात येणार असून, शनिवारी त्यातील काही वाहनांचे वितरण पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विजय पाटील यांनी सांगितले, २०१८ मध्ये राज्यात रस्ते अपघातात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू झाला असून, २० हजार जण गंभीर जखमी झाले आहेत़ एकूण ३९ टक्के अपघात हेल्मेट नसल्यामुळे झाले असून,३० टक्के अपघात अतिवेगाने किंवा बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे झालेले आहेत. सीट बेल्ट न लावल्यामुळे १३ टक्के अपघात झाले आहेत.स्पीडगनचाही वापरद्रुतगती महामार्गावर खंडाळा येथे वेगाने जाणा-या वाहनांवर स्पीडगनद्वारे कारवाई केली जाते. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी डावीकडून भरधाव वेगाने ओव्हरटेक करणा-या व लेन कटिंग करणा-या वाहनांविरोधात मोहीम हाती घेतली होती. त्यात १ ते ३० सप्टेंबर दरम्यान कारवाई करण्यात आली आहे.
लेन तोडल्याने पुणे एक्स्प्रेसवेवर १५ हजार वाहनचालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 5:49 AM