लोणी काळभोर - फेसबुकवरून झालेल्या मैैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीबरोबर एका तरुणाने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ‘पैसे दे; अन्यथा क्लिप सर्वांना दाखवीन,’ अशी धमकी देणाऱ्या या तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश दत्तात्रय कदम (वय २१, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ मध्ये पीडित मुलीला गणेश कदम याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने तिचा स्वीकार केला. कदम त्याच कॉलेजमध्ये टीवाय बीकॉमचे शिक्षण घेत होता. त्यातूनच दोघांची मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दि. ५ आॅगस्ट २०१७ रोजी वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लॉजमध्ये नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याची पुनरावृत्ती सप्टेंबर २०१७ व जानेवारी २०१८ मध्ये झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो तिला कॉलेजमध्ये भेटला त्या वेळी त्याने त्याच्या मोबाईलमधील दोघांच्या शारीरिक संबंधांची क्लिप दाखवली व ‘जेवढे पैसे असतील तेवढे दे; अन्यथा क्लिप सर्वांना दाखवीन,’ अशी धमकी दिली. यामुळे ती घाबरली. तिने क्लिप डीलिट करण्याची विनंती केली; परंतु त्याने तिचे एकले नाही. घाबरून तिने ही बाब कोणाला सांगितली नाही.घरात ठेवलेल्या बहिणीच्या सोन्याच्या रिंगा व टॉप्स हडपसर येथील एका सोनाराला विकले व आलेले चार हजार रुपये गणेशला दिले. त्यानंतर तिने वारंवार आपल्या कुटुंबीयांना माहिती न होता घरातील सुमारे ३० ते ४० हजार रुपये त्याला दिले. १ एप्रिल २०१८ रोजी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने ती बाब सांगितली. त्यानंतर उरुळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन गणेश कदम याच्या विरोधात तक्रार दिली.
पैसे न दिल्यास क्लिप सर्वांना दाखविण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 3:02 AM