निरवांगी : निमसाखर व परिसरातील ज्वारीच्या पिकाला सध्या पाण्याची गरज भासू लागली आहे. पाण्याअभावी पिके माना टाकू लागल्या आहेत. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, सराफवाडी व परिसरात चांगल्या प्रकारे ज्वारीची उगवण झाली आहे. परंतु सध्या पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. या मुळे कालव्याचे पाणी गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाचे पाणी जर या पिकांना वेळेत मिळाले तर या परिसरातील ज्वारीचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळेल. इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर परिसरात सध्या चांगल्या प्रकारे ज्वारीची उगवण झाली आहे. वेळेत पाणी जर मिळाले तर ज्वारीचे चांगले उत्पादन मिळेल. सध्या ज्वारीला चागंलादरही मिळत आहे. तसेच ज्वारीच्या कडब्यासही चांगला दर येत असल्याने या पिकांना वेळेत पाणी मिळाले तर शेतकºयांना या पिकातून चार पैसे नक्कीच मिळतील. परंतु, वेळेत पाणी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.