योगेश्वर माडगूळकर । लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहर परिसरामध्ये विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत वारंवार तक्रार केली जात आहे. बऱ्याच वेळा फटका बसल्यानंतर अनेकांना जाग येते. का फ सलो वरलिया रंगा असे म्हणत अनेक जणांना कोट्यवधींचा गंडा बसला आहे. याबाबत केलेले स्टिंग आॅपरेशन.प्रतिनिधी : हॅलो!टेलिकॉलर : मैं इंदोर से बात कर रहा हूँ. आप का ट्रेडिंग कैसा है?प्रतिनिधी : नही, खराब है.टेलिकॉलर : आप एक काम करो, कल एक कंपनी का शेअर खरेदी कर दो. इंटरा डे मे बेच लो.प्रतिनिधी : ठीक है.टेलिकॉलरने सांगितलेली शेअरची दिवसाची किंमत ७० रुपये होती. तो शेअर वाढून ८० रुपयापर्यंत गेला. हे प्रतिनिधीने पाहिले. कोणत्याही शेअरची खरेदी केली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा टेलिकॉलरने फोेन केला. टेलिकॉलर : कल आपको प्रॉफिट मिल गयी ना!प्रतिनिधी : जी हॉँ. टेलिकॉलर : आप एक काम करो, उस कंपनी का शेअर ले लो. इंटरा डे मैं लेने का, ध्यान रखो.प्रतिनिधी : जी हॉँ.दुसऱ्या दिवशी प्रतिनिधीने संबंधित कंपनीच्या शेअरची सकाळची किंंमत पाहिली. दुपारनंतर शेअरमध्ये घसरण झाली. प्रतिनिधीने आलेल्या फोनवर फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तो स्वीच आॅफ होता. असाच अनुभव शहरवासीयांना आला आहे. याप्रकरणी कोणीही तक्रार देत नाही. प्रतिनिधी सकाळी फोन येतो. आॅनलाइन टाइपिंगची कामे करा आणि पैसे मिळवा. सेल्समन : सर, आमच्या कंपनीमार्फत आॅनलाइन टायपिंगची कामे करून घेतली जातात. तुमचे उत्पन्न वाढेल, तुम्ही तयार आहात काप्रतिनिधी : हो तयार आहोत. सेल्समन : आम्ही एवढे मोठे काम देणार, त्यासाठी आमच्याकडे काही रक्कम भरावी लागेल, त्यानंतर आॅनलाइन रजिस्ट्रेशन होईल. प्रतिनिधी : हो, चालेलसेल्समन : खात्याची डिटेल देतो. प्रतिनिधी संबंधित बँकेत चलन भरून सेल्समनला फोन करतो. पण त्याचा फोन बंद लागतो. बेरोजगारांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत.कूपन भरा, बक्षीस मिळवाप्रतिनिधी एका मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेला. त्या ठिकाणी दोन-तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी प्रतिनिधीकडे एक कागद दिला. हे कूपन भरून द्या. तुम्हाला बक्षीस लागेल. सेल्समन : सर, हा फॉर्म भरा. तुम्हाला बक्षीस लागेल. प्रतिनिधी : ठीक आहे.सेल्समन : सर, तुम्हाला बक्षीस लागले आहे. तुमचे कुपन सिलेक्ट झाले आहे. अभिनंदन! प्रतिनिधी : ठीक आहे. सेल्समन : तुम्ही कुटुंबीयांसह पिंपळे सौदागर येथील मॉलमध्ये या. तिथे तुम्हाला गिफ्ट मिळेल. सेल्समन : आपण क्रेडिट कार्ड वापरता? प्रतिनिधी : हो. सेल्समन : कार्ड नंबर मिळेल? प्रतिनिधी : हे बघा, तुम्ही इतरांना फसवत असाल, आमच्याकडून काही मिळणार नाही. सेल्समन : सॉरी, तुमचे गिफ्ट तयार आहे. ज्यूस प्या आणि वजन घटवासेल्समन : सर, आमच्या कंपनीने फ्री बॉडी चेकअप सुरू केला आहे. कोणतीही फी नाही, तुम्ही मोफत तपासणी करू शकता. प्रतिनिधी : ठीक आहे. सेल्समन एका आॅफिसमध्ये घेऊन जातो. तेथील मशिनवर प्रतिनिधीला उभे केले जाते. मोजमाप,वजन घेतले जाते. सर्व टिप्पणी केली जाते. सेल्समन : आपले वजन वाढले आहे. आपले अवयवाचे वय जादा आहे. तुम्हाला लवकर हार्ट प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. प्रतिनिधी : बाप रे!सेल्समन : तुम्ही एक काम करा. आमच्याकडे महिनाभर ज्यूस देण्याची सोय आहे. तुम्ही ज्यूस प्या. तुमचे वजन कमी होईल. त्यासाठी सुमारे तीन हजार खर्च येईल.प्रतिनिधी : तीन हजार रुपये खर्च करून वजन कमी झाले नाही, तर पैसे परत मिळणार का?सेल्समन : नाही. त्यानंतर आम्ही महिना २००० रुपयांची ट्रीटमेंट सुरू करतो. प्रतिनिधी : ठीक आहे, विचार करतो.शहरात अशी अनेक सेंटर आहेत. तिथे अशाप्रकारे फसवणूक केली जाते. पण याबाबत कोणीही तक्रार करीत नाही. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अनेक लोकांनी ही दुकाने थाटली आहेत. अनेक सुशिक्षित लोकांचा त्यात बळी जात आहे.