शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

मतदान प्रतिनिधीला धमकावले; मेडदच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा

By admin | Published: October 16, 2014 6:09 AM

मेडद (ता. बारामती) येथे निवडणुकीच्या वादातुन एकास धमकावल्याचा प्रकार प्रकार घडला. या प्रकरणी गावचे सरपंच अर्जुन यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती : मेडद (ता. बारामती) येथे निवडणुकीच्या वादातुन एकास धमकावल्याचा प्रकार प्रकार घडला. या प्रकरणी गावचे सरपंच अर्जुन यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, बहुजन समाज पक्षाचे मतदान प्रतिनिधी रणजित लक्ष्मण गाढवे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरपंच अर्जुन शंकर यादव, गणेश दत्तात्रय काशिद, संतोष शिवाजी यादव (सर्व रा. मेडद) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना माहिती देत होते. त्यावेळी गाढवे यांनी ‘मतदारांना त्यांच्या मनाने मतदान करू द्या’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी सरपंच यादव यांच्यासह तिघांनी गाढवे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. प्रकार थांबविण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण मतदान केंद्रावर गेले. गाढवे यांनी या प्रकरणी धमकावल्याची फिर्याद दिली. त्यानुसार यादव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के करीत आहेत. (प्रतिनिधी)