या प्रकरणी संबंधित ठेकेदार विठ्ठल कांबळे (रा.गोपाळवाडी, ता.दौंड) यांनी यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. रविवार दिनांक १२ रोजी विद्युत कर्मचाऱ्यांनी सकाळी पाटस परिसरात टॉवरचे काम सुरू केले. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता टॉवर उभारले. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी टॉवरच्या खालचे खांब जमिनीपासून कट करून, तीन टॉवर जमीनदोस्त करण्यात आले. दुसऱ्या दिवशी कर्मचारी कामकाजासाठी आले असता, त्यांना तीन टॉवर जमीनदोस्त झाले असल्याचे दिसले. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हे काम केले असल्याचा अंदाज वर्तवून, या घटनेबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आली. एकंदरीतच तीन टॉवर जमीनदोस्त झाल्यामुळे शासनाचे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणी पोलीस आरोपीच्या शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाटस येथे विद्युत टॉवर अज्ञात चोरट्यांनी खाली पाडले.