शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सव्वातीन तासांत यकृत पुण्यात!

By admin | Published: December 27, 2016 3:04 AM

नाशिक येथून यकृत (लिव्हर) घेऊन निघालेली सुसज्ज रुग्णवाहिका पुणे-नाशिक महामार्गाने अवघ्या सव्वातीन तासांत पुणे येथे ठिकठिकाणच्या पोलिसांनी ग्रीन कॅरिडॉर

आळेफाटा : नाशिक येथून यकृत (लिव्हर) घेऊन निघालेली सुसज्ज रुग्णवाहिका पुणे-नाशिक महामार्गाने अवघ्या सव्वातीन तासांत पुणे येथे ठिकठिकाणच्या पोलिसांनी ग्रीन कॅरिडॉर राबवत रस्ता मोकळा केल्याने पोहोचली. यामुळे एका रुग्णाचे प्राण वाचले. पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी नाशिक येथील ऋषिकेश हॉस्पिटलमधील एका १९ वर्षीय अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे यकृत काढून नेण्याचे ठरले. यकृत ठराविक वेळेत पोहोचणे अपेक्षित असल्याने पुणे येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने महामार्गावरील संबंधित पोलीस ठाण्यांना याबाबत कळविण्यात आले. दरम्यान, आज सोमवारी सकाळी सर्व तयारी पूर्ण झाली. सुसज्ज रुग्णवाहिकेतून यकृत घेऊन तज्ज्ञ डॉक्टर पावणेआठच्या वेळेला नाशिक येथून रवाना झाले, तर पोलिसांच्या ग्रीन कॅरिडॉरमुळे ही रुग्णवाहिका सव्वातीन तासांतच पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये पोहोचली, अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मोकळा रस्तानाशिक येथून यकृत घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला वाहतुकीत अडथळा होऊ नये, यासाठी आळेफाटा पोलिसांनीही जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी ते नारायणगावपर्यंत ग्रीन कॅरिडॉर केला होता. रुग्णवाहिका सुखरूप जाताच तैनात पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.