लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व सोनसाखळी चोरल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. पटेल यांनी मंगळवारी दिले. अनिकेत अर्जुन चौधरी (वय १९, रा. थेरगाव), विकी अनिल घोलप (वय २०, चिंचवडगाव) आणि सुमील अतुल पंडित (वय २३, रा. थेरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी अभिजित शिवाजी बारणे (वय २७, रा. क्रांतीवीर कॉलनी थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे. हा प्रकार २३ जून रोजी रात्री साडेआठ वाजता थेरगाव येथे घडला. याप्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. सचिन ठाकूर याने बारणे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावर बारणे यांनी पैसे मागण्याचा काय संबंध? असे विचारले असता सचिन व साथीदारांनी त्यांना मारहाण केली. बारणे यांच्या गळ्यातील ३० गॅ्रम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि १४ हजार ९०० रुपये चोरले. त्यांच्या मोबाईल व कारचे नुकसान केले. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.
मारहाण, चोरीप्रकरणी तिघे अटकेत
By admin | Published: June 28, 2017 4:27 AM