शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मेहुणीच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2016 3:49 AM

सासऱ्याची २० एकर जमीन मिळवण्यासाठी मेहुणीचा खून करून सासऱ्यावर वार करून त्याच्याही खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जावयासह तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे

पुणे/बारामती : सासऱ्याची २० एकर जमीन मिळवण्यासाठी मेहुणीचा खून करून सासऱ्यावर वार करून त्याच्याही खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जावयासह तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी दिली. विशाल सोपान वत्रे (वय २४, रा. घर नं. ७६५, गावठाण मंचरवाडी, ता. दौंड), जयदीप चव्हाण (वय २९, रा. येडेवाडी, लिंगआळी, ता. दौंड) आणि केरबा मेरगळ (वय २७, रा. मसणरवाडी, मेरगळमळा, ता. दौंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शीतल बाराते (वय २४) खून केला होता, तर रमेश बाराते (वय ४५, रा. बाबुर्डी, ता. बारामती) यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. मात्र ते बचावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हा रमेश बाराते यांचा जावई आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा तो नवरा आहे. तर दुसरी मुलगी शितल मध्यप्रदेशामधील एका डेंटर कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिकत होती. त्यांच्या नावावर २० एकर जमीन आहे. ही जमीन मिळवण्यासाठी विशालने मेरगळ आणि चव्हाणच्या मदतीने खून केला. त्यासाठी ४० हजार रुपये दिले. यापुर्वी शीतल ही एकदा मैत्रीणीसह रेल्वेतुन प्रवास कर खून करण्याचा प्रयत्न विशालने केला होता. मात्र शितलची मैत्रीण सोबत असल्याने त्याचा डाव फसला होता. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरीक्त अधिक्षक तानाजी चिखले, राजेंद्र मोरे यांच्यासह एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक निरीक्षक आर. एन. रामाघरे, उपनिरीक्षक अंकुश माने आणि पोलिस पथकाने आरोपींना सापळा रचुन अटक केली.बाराते मंगळवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान शितलसह मोटारसायकलवरून हिंगणीगाडा ते सुपे रोडने जात होते. आरोपींनी त्यांना गाठत धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये शितलचा जागीच मृत्यू झाला. तर बाराते गंभीर जखमी झाले. हल्ला हा चोरीच्या उद्देशाने केला असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मिरची पुड टाकण्यात आली होती. विशाल वत्रेने त्याने केलेल्या गुन्हयाची कबुली दिली असून त्याला पुढील तपासासाठी यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.