पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू गेंगजा हा पिंपळे गुरव पुणे येथे राहत होता व चाकणमधील बजाज कंपनीत काम करत होता. दि.२७ रोजी मोटारसायकलवर तो गोहे संगमवाडी येथे आपल्या गावी आला. याच दिवशी सायंकाळी आठच्या सुमारास वसंत उभे यांच्या नवीन घराच्या बांधकामावर बसला असता तेथे ओंकार घोलप, सुरज घोलप, अनिकेत घोलप हे तिघे आले व जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याला मारहाण केली.
या मारहाणीमध्ये बाबू गेंगजे याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्याने घोडेगाव पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दिली होती व पुढील उपचार पुणे येथे वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज दि.४ रोजी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाण केल्याप्रकरणी आरोपी ओंकार घोलप, सुरज घोलप, अनिकेत घोलप व इतर चार अशा जणांवर दि.२७ रोजी गुन्हा दाखल झाला होता व आज बाबू गेंगजेचा मृत्यू झाल्यानंतर या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तीनही आरोपांचा शोध व गुन्हाचा तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांभाते यांनी घटना घडली त्या ठिकाणी भेट दिली व पोलीस तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या.