या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, माजी उपसभापती अमोल पांगारे, सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहू शेलार, पंचायत समिती सदस्य पूनम पांगारे, कंपनीचे महारुद्र जंगम विठ्ठल कोंढाळकर,हनुमान शिंदे उपस्थित होते.
शिंदेवाडी सरपंच अरविंद शिंदे, अमोल पांगारे यांच्या विशेष सहकार्याने भोर ग्रामीण रुग्णालय तसेच बारामती ग्रामीण गवरुग्णालय व ताराचंद हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी ३ व्हेंटिलेटर १२ लाख रुपये किमतीचे आणि ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ३ लाख २५ हजार किमतीचे, असे १५ लाख २ हजार ५०० रुपये मशिनरी पुणे जिल्ह्यातील भोर येथील उपजिल्हा रुग्णालय, बारामती आणि हवेली तालुक्यांना दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रायव्हेट लिमिटेड हिंजवडी पुणे यांच्यातर्फे देण्यात आले.
--
फोटो क्रमांक : ०९ भोर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
ओळी : व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप करताना कंपनीचे अधिकारी रणजीत शिवतरे अमोल पांगारे व इतर फोटो