उरुळी कांचन - महावितरणकडून कृषी पंपाच्या थ्री फेज भारनियमनच्या वेळेचा बदलाचा फटका शेतक-यांना ऐन थंंडीत चांगलाच बसू लागला आहे. महावितरणने आठवड्यात तीन दिवसांत ऐन थंडीत रात्रीच्या वेळेस शेतीसाठी वीजपुरवठा देण्याचे वेळापत्रक सुरू केले आहे. महावितरणच्या या निर्णयाने शेतक-यांना कडाक्याच्या थंडीत शेतीला पाणी देण्याची कसरत करावी लागत आहे. महावितरणच्या प्रमाणवेळेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणकडून शेतकºयांचा कृषी पंपांना ऐन थंडीत शेतीला रात्री ८ तास वीजपुरवठा सुरू होत आहे. या भारनियमनात शेतकºयांना दिवस रात्र या प्रमाणे २४ तासांपैकी ८ तास वीज देण्यात येत आहे. हप्त्यातून चार दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू आहे. त्यानुसार कृषीपंपांना सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ असा पुरवठा सुरू आहे. तर शुक्रवार रात्री १० ते रविवार सकाळी ६ पर्यंत पुरवठा सुरू आहे. महावितरणकडून रात्रीच्या वेळेत तीन दिवसांत भारनियमन होत असल्याने शेतकºयांना थंडीत पाणी देण्याची कसरत करावी लागतआहे, थंडीत पाणी नियोजन मुश्कील झाले आहे.कृषी संजीवनीस द्यावी मुदतवाढराज्य सरकारने शेतकºयांच्या थकीत वीजबिलांसाठी कृषी संजीवनी योजना राबविली आहे. ७ नोव्हेंबरपासून मुदतवाढ देऊन ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेत सहभागी होऊन दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी बाळासाहेब म्हेत्रे यांनी केली आहे.४ महावितरणने हप्त्यात एकाच पद्धतीने रात्रीच्या वेळेत भारनियमन केल्यास शेतकºयांना दिवसा शेतीच्या पाण्याचे नियोजन करता येणार आहे. महावितरणकडून ८ तास रात्रीच्या सुमारास वीज देऊन विजेत खंडितपणा वाढल्याने थंडीत कृषी पंप चालू करण्यासाठी आणखी अडचणीत भर घालीत आहे.
४ सध्या थंडीचा प्रभाव वाढला असून पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे.