पुणे : गेली तीस वर्षे सातत्याने प्रथितयश कवींच्या काव्यावर आधारित कार्यक्रमांची श्रृंखला सादर करीत असलेली अनन्वय फौंडेशन असाच एक वेगळा कार्यक्रम घेऊन रसिकांसमोर येत आहे. दि. २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी रॉय किणीकर, अरुण कोल्हटकर,आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावरआधारित 'कवितेचे तीन दिवस...या काव्यरूपी महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. फाऊंडेशनच्या काव्ययात्रेला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांपासून सुरूवात झाली. संत कवी ज्ञानेश्वर, बालकवी, माधव जूलियन, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभु, रॉय किणीकर, विंदा करंदीकर आदी दिग्गजांची कविता 'अनन्वय'ने आपल्या व्यासपीठावरून मांडली.
कवितेचे तीन दिवस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 8:01 PM
रॉय किणीकर, अरुण कोल्हटकर,आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावरआधारित 'कवितेचे तीन दिवस...या काव्यरूपी महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
ठळक मुद्देरॉय किणीकर, अरुण कोलटकर, आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावर विशेष कार्यक्रमकवी अरुण कोलटकरांची कविता अनन्वयच्या वतीने पहिल्यांदाच काव्य रसिकांच्या समोर