पुणे - मध्य महाराष्ट्रासह राज्यात विश्रांती घेतेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. 22 ते 24 दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता. येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
23 जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 24 जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .