शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघे सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 8:06 AM

दोघे निष्पन्न, पोलिसांकडून एकाचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट व्यक्तींचे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्र्यांच्या एकूण तीन डुप्लिकेटपैकी विजय माने व भीमराव माने यांची ओळख पटली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे पूर्वी रिक्षाचालक होते. त्यामुळे पिंपरी- चिंचवडमधील रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा तरुणपणाचा फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो म्हणून व्हायरल झाला होता. त्यानंतर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून फिरतो. नुकताच त्याचा व सराईत गुन्हेगार शरद मोहोळसोबत सीएम वेशभूषेतील फोटो व्हायरल झाला.  हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी या फोटोबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल केला. सांगली येथील जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने स्पर्धा आयोजित केली होती. त्याठिकाणी तमाशा देखील ठेवण्यात आला होता. त्या तमाशात सांगलीत दुसरा डुप्लिकेट मुख्यमंत्री म्हणून भीमराव माने याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखी वेशभूषा केली. तो या कार्यक्रमात नाचताना दिसून आला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर कारवाई सुरू आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून डुप्लिकेट सीएम म्हणून मिरवतात.  हे डुप्लिकेट नाचगाण्यात अन् गुंडांसोबत वेगवेगळ्या प्रकारे फोटो व व्हिडीओ काढतात, ते व्हायरल करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लौकिकास बाधा आणल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीPuneपुणे