जनावरांना पौष्टिक चारा मिळावा यासाठी शेतकरीवर्ग ऊस वाढे, मका, ऊस, कडवळ, घास मूरघास या चाऱ्याचा वापर करत असतो. ओला व सुका चारा या मिश्रणाने गाई-म्हशींच्या दुधात चांगली वाढ होते. पशुखाद्य खुराक यांच्याबरोबर ऊसवाढे व मका कडबा यांचा चारा दिल्याने जनावर पाणी पिऊन शांत राहते. त्यामुळे या भागात ऊस वाढयाला मोठी मागणी आहे. अनेक शेतकरी मोटर सायकल, छोटी पिकअप यामध्ये ऊसवाढे भरून गोठ्याजवळ त्यांच्या जनावरांना वर्षभर पुरेल इतका साठा करून ठेवतात. कडबा कुट्टी मशीनमुळे चाऱ्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असते चारा हा वाया जात नाही. या कोठीचा याचा उपयोग होत असतो त्यामुळे नदीकाठच्या परिसरात ऊसतोड कामगार यांना दररोज हक्काचे चार पैसे ऊस वाढ्यातून मिळत असून घरखर्च हा ऊस वाढ्यावर चालत असतो.
जनावरांना ओला व सुका चारा दिल्यामुळे दुधाच्या उत्पन्नातही वाढ होते. कडबा कुट्टीमुळे चारा वाया जात नाही.
जीवन काका तांबे संचालक जिल्हा दूध संघ.
--
फोटो क्रमांक : २४ रांजणगाव सांडर ऊस तोड
फोटो ओळी : रांजणगाव सांडस येथे रस्त्याच्या कडेला उसाचे वाढे खरेदी- विक्री करताना पशुपालक ऊसतोड कामगार