शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

एकाच व्यासपीठावरुन तीन अधिकाऱ्यांनी मांडला पुण्याचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 7:39 PM

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विविध मान्यवरांसह वार्तालापाचे अायाेजन करण्यात येते. यावेळी शहर व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिक बजावणाऱ्या तीन सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. त्यांनी शहराच्या व जिल्ह्याच्या एकूण विकासाचा अाढावा घेतला.

ठळक मुद्देशहरात येत्या काळात 32 हजार काेटींची कामे करण्यात येणारहायपूर लूप सेवेबाबत चाचपणी सुरु

पुणे : भारतातील राहण्यास सर्वात उत्तम असलेले शहर, आयटीने दिलेली नवी ओळख, शिक्षणाचा माहेरघर ते स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर,  अश्या विविध ओळख प्राप्त करणाऱ्या पुण्याच्या विकासाचा आराखडा तसेच शहर व जिल्ह्या समोरील आव्हाने तीन अधिकाऱ्यांनी एकाच व्यासपीठावरुन मांडली.     निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा या विषयावरील वार्तालापाचे. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते या तिघा अधिकाऱ्यांनी पुण्यातील विकास कामे, येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच उभी ठाकलेली आव्हाने यांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.     कुणाल कुमार म्हणाले, २०१४ साली मी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पुण्याच्या १५२ विषयांवर काम करण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर काम करण्यास सुरुवात केली. शहरातील नागरिकांचा शहराच्या विकासाबद्दलच्या सुचनांमध्ये मोठा सहभाग असतो. एका अहवालानुसार पुणे हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राहण्यास उत्तम शहर असल्याचे समाेर अाले आहे.  प्रत्येक पुणेकर घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला शहर आपलं स्वागत करीत असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. यादृष्टिने काम करण्यात येत आहे. शहराला जास्तीत जास्त डिजिटायज करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात शहरात 32 हजार काेटींची कामे करण्यात येणार अाहेत.      सौरव राव म्हणाले, पुणे जिल्ह्याची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. जिल्ह्याची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. येत्या काळातही 190 गावांचा या उपक्रमात सहभाग करुन घेण्यात येणार अाहे.  प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा थर्ड पार्टीकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम करण्यात येत आहे. पुरंदरमध्ये प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी ज्यांच्या जागा घेण्यात येत आहेत, त्यांना त्रास होणार नाही, व त्यांना योग्य मोबादला कसा मिळेल याकडे लक्ष देण्यात येत आहे.     गित्ते म्हणाले, पुणे महानगरचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएला आर्थिक स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो ही पीपीटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. हायपर लूप बाबतही प्राथमिक चाचणी करण्यात येत असून, पुणे - मुंबई दरम्यान हायपर लूप सेवा सुरु करणे शक्य आहे का, याबाबतची पाहणी सध्या करण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेkunal kumarकुणाल कुमारKiran Gitteकिरण गित्तेSaurabh Raoसौरभ राव