पुणे : नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.
चंद्रकला राजू भूल (30, रा. थेऊर), भजन भरतसिंह भूल (22) आणि सोनिया राजू भूल (4) अशी पाण्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला भूल या कपडे धुण्यासाठी थेऊर येथील नदी पात्रात गेल्या होत्या. काही वेळात चंद्रकला, भजन आणि सोनिया हे पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली.दरम्यान, पाण्यात चंद्रकला आणि इतर दोन जण वाहून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करीत आहेत.