पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर विषय समित्यांच्या पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतिपदी बारामती तालुक्यातील प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी मावळचे बाबूराव वायकर, समाजकल्याण सभापतिपदी दौंड तालुक्यातील सारिका पानसरे यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत हवेलीतील मांगडेवाडी डोणजे गटाच्या पूजा पारगे या निवडून आल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदी रणजित शिवतरे यांची निवड ११ तारखेला झाली. खेड तालुक्याला अध्यक्षपद तर भोर तालुक्याला उपाध्यक्षपद मिळाल्याने सभापतिपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष होते. विषय समितीच्या सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. २४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी काम पाहिले.विषय समित्यांसाठीही अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी केली होती. अध्यक्षपदाच्या निवडीच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे संधी कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष होते. निवडणुकीसाठी ३ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी यांनी अर्ज भरण्यासाठी ३ वाजेपर्यंतची वेळ दिली होती, तर अर्ज माघार घेण्यासाठी ३.४५ पर्यंत वेळ दिली होती. चार जागांसाठी आठ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले. यात बांधकाम व आरोग्य सभापतिपदासाठी गुलाब पारखे, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदासाठी दिलीप यादव, समाज कल्याण सभापतिपदासाठी शैलजा खंडागळे, तर महिला बालकल्याण सभापतिपदासाठी भाजपच्या वंदना कोद्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. छाननीनंतर सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. खंडागळे, यादव, पारखे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. मुदतीत माघारी अर्ज सादर न झाल्याने महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी सारिका पानसरे, भाजपच्या कोद्रे यांच्यात निवडणूक झाली. सभागृहात उपस्थित ६६ सदस्यांनी हात वर करून पूजा पारगे यांची बहुमताने निवड केली. पीठासन अधिकारी बारवकर यांनी विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली...........४राज्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत महाविकास आघाडींचा पर्टन दिसून आला. यामुळे पुणे जिल्ह्यातही महाविकास आघाडी होणार का, अशी चर्चा सुरू होती. अजित पवार यांनीही महाविकास आघाडीचे संकेत दिल्याने शिवसेना आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्ष निवडीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून पक्षाच्याच ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामुळे शिवसेनेने या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. .............सभागृहाचा दबाव झुगारून पीठासन अधिकाºयांनी घेतली नियमानुसार निवडणूकविषय समितींच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी काम पाहिले. त्यांनी अर्ज माघारी घेण्यासाठी ३.४५ ची वेळ दिली होती. चार जागांसाठी ८ जणांनी अर्ज केले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत केवळ तिघांनीच माघार घेतली............
जिल्हा परिषदेचे तीन सभापती बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 3:15 PM
खेड तालुक्याला अध्यक्षपद तर भोर तालुक्याला उपाध्यक्षपद मिळाल्याने सभापतिपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष होते.
ठळक मुद्देएका पदासाठी लागली निवडणूक : महिला बालकल्याण सभापतिपदी ६६ मतांनी पूजा पारगे विजयीविषय समित्यांसाठीही अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती मोर्चेबांधणी निवडणुकीसाठी ३ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन