पुणे : डॉग प्रशिक्षकाकडील २ लाख ८० हजार रुपयांचा लासपसो जातीचा कुत्रा चोरुन नेण्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला असून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. निरंजन आनंद कुलकर्णी (वय ३४, रा. रक्षलिका सोसायटी, धनकवडी) आणि अमोल मारुती चव्हाण (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन मधुराज अॅन्थोनी (वय ३६, रा़ निंबाळकर वाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन अॅन्थोनी हे डॉग ट्रेनर आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते डॉग ट्रेनिंगचे काम करीत आहेत. त्यांच्याकडे बऱ्याच जातीचे कुत्री असून ती त्यांनी पाळलेली आहेत. २८ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता ते पत्नीसह कुत्र्यांना खाद्य आणायला गेले होतो. त्याकाळात त्यांच्या फॉर्म हाऊसवरील मोकळ्या जागेत लासपसो जातीचे कुत्र दिपानी हिलफायईर ऊर्फ लिओ हे २ लाख ८० हजार रुपयांचे कुत्र होता. तो दोन वर्षे चार महिन्यांचा असून त्यावेळी आलेले निरंजन आणि अमोल चव्हाण फार्म हाऊसवर आले. एकाने तेथील नागरिकांना बोलण्यात गुंतवून ठेवले तर दुसरा श्वान घेवून पसार झाला. पोलिस तपासात परिसरातील प्रत्यक्षदर्शींनी श्वान चोराची माहिती दिली. संशयीत निरंजन आणि अमोल या दोघांचाही श्वान ब्रिडिंगचा व्यवसाय आहे. अॅन्थोनी हे परत आल्यावर त्यांना हा प्रकार समजला़ त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ सचिन अॅन्थोनी यांनी सांगितले की, गेली तीन दिवस झाले माझा कुत्रा उपाशी आहे. कारण तो माझ्याशिवाय खात नाही. नुकताच झालेल्या डॉग शोमध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या शरीरात अजून स्पर्धेकरीता मायक्रो चीप आहे. याबाबत निरंजन कुलकर्णी यांनी सांगितले की, आमचाही श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय असून सचिन जेथे आता ज्या फॉर्म हाऊसवर हा व्यवसाय करतात. तेथे आम्ही व्यवसाय करत होते. आमचेही कुत्रे अनेकदा पळून गेले होते. नंतर ते त्याच परिसरात सापडले़ आमच्यावर संशय घेतल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेऊन मध्यस्थामार्फत त्यांना कुत्रा परत केला असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे. मात्र, आपल्याला अद्याप कुत्रा परत मिळाला नसल्याचे सचिन अॅन्थोनी यांनी सांगितले. ़़़़़़़़़़़हम आपके है कौन? च्या टफीला दिले होते प्रशिक्षणश्वान मालक सचिन अँथोनी यांचे वडिल मधुराज अॅन्थोनी यांचा गेली ५० वर्षांपासून श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय आहे़ सलमान खान, माधुरी दीक्षित यांचा ‘हम आपके है कौंन’ मधील टफी या श्वानाची भूमिकाही तितकीच महत्वाची व लोकप्रिय झाली होती़ या टफी याला अॅन्थोनी यांनी प्रशिक्षण दिले होते़
डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 9:40 PM
हम आपके है कौन? च्या टफीला दिले होते प्रशिक्षण
ठळक मुद्देफिर्यादींचा श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल गेली तीन दिवस झाले माझा कुत्रा उपाशी