शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पुणे जिल्ह्यात आता तीन मंत्री

By admin | Published: December 06, 2014 4:04 AM

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना मंत्रिपद मिळाले होते.

पुणे : पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना मंत्रिपद मिळाले होते. कसबा मतदारसंघातून ५ वेळा सलग आमदार राहण्याची हॅट्ट्रिक करणारे गिरीश बापट यांच्या आणि शिवसेनेचे पुरंदरमधील आमदार विजय शिवतारे यांच्या रूपाने पुणे शहर व जिल्ह्यास आणखी दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.कसबा मतदारसंघाला बापट यांच्या रूपाने प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. पुरंदर तालुक्याला तत्कालिन कृषिराज्यमंत्री दादा जाधवराव यांच्यानंतर शिवतारे यांच्या रूपाने मंत्रिपद बहाल झाले आहे. कँटोन्मेंटला रमेश बागवे यांच्यानंतर पुन्हा मंत्रिपद बहाल झाले आहे . भाजपाचे शिवसेनेशी मनोमिलन झाल्याने शिवतारे यांच्या मंत्रिपदावरही शिक्कामोर्तब झाले आहे. शिवतारे यांचे नाव ते निवडून आल्यानंतर मंत्रिपदासाठी घेतले जात होते. पुरंदर तालुक्यात पवार कुटुंबाशी सातत्याने करत असलेल्या संघर्षामुळे त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र पक्षाच्य प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नावही चर्चेत होते. मात्र, विस्तारात शिवतारे यांनी बाजी मारली. आघाडी सरकार असताना पुणे जिल्ह्यात अजित पवार यांचे जलसंपदा व नंतरचे उपमुख्यमंत्रिपद, दिलीप वळसे पाटील यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद आणि नंतरचे ऊर्जामंत्रिपद, हर्षवर्धन पाटील यांचे सहकारमंत्रिपद, रमेश बागवे यांचे गृहराज्यमंत्रिपद, बाळासाहेब शिवरकर यांचे बांधकाम राज्यमंत्रिपद, चंद्रकांत छाजेड यांचे पर्यटनमंत्रिपद अशी मंत्रिपदाची १५ वर्षांत परंपरा होती. बारामती, इंदापूर आणि आंबेगाव या तालुक्यांचे मंत्रिपदांचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता कसबा आणि पुरंदर तसेच कँटोन्मेंट या मतदारसंघांमध्ये लाल दिवा झळाळणार आहे.भाजपचे पूर्वीपासून प्रस्थ असलेल्या मावळ तालुक्यासही मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती.मात्र संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना ती संधी मिळाली नाही. पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता मावळली आहे. (प्रतिनिधी)