शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

तीन महिन्यांच्या चिमुरडीला सोपवून जन्मदाता पळाला

By admin | Published: April 25, 2015 5:18 AM

गजबजलेला लष्कर परिसर...महात्मा गांधी रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी...लष्कर न्यायालयासमोरुन एक महिला सोने खरेदीसाठी जात होती

पुणे : गजबजलेला लष्कर परिसर...महात्मा गांधी रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी...लष्कर न्यायालयासमोरुन एक महिला सोने खरेदीसाठी जात होती...एक तरुण येतो... हातात तीन महिन्यांची तान्हुली असते...मी पार्क केलेली मोटार घेऊन येईपर्यंत तुम्ही हिला जवळ ठेवा, असे सांगून तो जातो...बराच वेळ झाला तरी तो परत येत नाही...दुपारच्या उन्हाच्या तडाख्यात ही तान्हुली रडायला लागते...महिलेला नेमके काय करावे कळत नाही...पोलिसांना बोलावले जाते आणि तान्हुली ससून रुग्णालयात पोहोचते. आई-वडिलांच्या वादात या तान्हुलीवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील ३५ वर्षीय महिला सोने खरेदीसाठी जात होती. अडीचच्या सुमारास त्यांना एका तरुणाने आवाज दिला. साधारणपणे साडेसहा फूट उंच, रंगाने सावळा, अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची पँट घातलेला हा तरुण हातामध्ये तीन महिन्यांची मुलगी घेऊन आला. अतिशय गोंडस आणि लाघवी असे बाळ पाहून ती महिला थांबली. ‘‘मी माझी गाडी जरा लांब पार्क केलेली आहे, ती मी घेऊन येतो. तो पर्यंत मुलीला तुमच्याकडे ठेवा’’ अशी विनंती त्याने केली. ही विनंती मान्य करीत त्या महिलेने मुलीला स्वत:जवळ घेतले. या मुलीसोबत एक बॅगही त्याने या महिलेकडे दिली. बराच वेळ वाट पाहूनही हा तरुण काही परत येत नव्हता. या महिलेने मुलीला घेऊन तिच्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागला नाही. शेवटी न राहवून या महिलेने पोलिसांना कळवले. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केल्यानंतर मुलीसोबत दिलेली बॅग तपासली. बॅगेतील चिठ्ठीवरून हा खुलासा झाला आहे.