विमाननगर - "मी महापालिकेच्या ठेकेदारांकडील सफाई कर्मचारी असून तीन महिने मला पगार मिळाला नाही, आम्ही आजाराने नाही पण उपाशी राहू मरू. तरी मंत्र्यांनी आमचा पगार लवकरात लवकर द्यावा" अशी कैफियत पुण्यातील एका ठेकेदारांकडील सफाई कर्मचार्याने कुंटुबियांसह सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून मांडली. त्यानंतर प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत त्याचे वेतन दिले. निधीची तरतूद असून देखील महापालिका अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या गोर गरिब कर्मचाऱ्यांना उपाशी राहण्याची वेळ येत आहे. अशा जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करु अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.दलित आदिवासी अधिकार आंदोलन या संस्थेकडे पुणे महापालिका ठेकेदारांकडील सफाई कर्मचार्यांना मागील तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची तक्रार आली होती. कर्वेनगर येथील एका सफाई कर्मचार्याने तीन महिने पगार न मिळाल्याने कुंटुबियांसह उपाशी राहण्याची वेळ आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला.घरात अन्नाचा कण नाही,लेकर बाळ उपाशी,खिशात पैसा नाही. वेळोवेळी चकरा मारून देखील पगार काही मिळालाच नाही. त्यामुळे अखेरीस त्याने ही गंभीर विदारक वस्तुस्थिती व्हिडिओद्वारे जनतेसमोर मांडली.त्याची तात्काळ दखल घेत या कर्मचाऱयांचे वेतन महापालिकेच्या वतीने तात्काळ देण्यात आले .मात्र कर्वेनगर सह येरवडा नगर रोड वडगाव शेरी परिसरातील अनेक ठेकेदाराकडील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप मिळाली नसल्याची तक्रार दलित आदिवासी अधिकार आंदोलन सोसलेला आली आहे .झोपडपट्टीतील सर्वसामान्य गोरगरीब जनता ही ठेकेदारांकडे शहरातील स्वच्छतेचे काम करते .जेमतेम पगारातच संसार भागवत असताना तीन तीन महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल अतिशय वाईट होत आहेत .एरवी महापालिका अनेक विकासकामांसाठी अनावश्यक निधी खर्च करते परंतु नागरिकांसाठी थेट कचऱ्याचे स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार न देणे अतिशय लाजीरवाणी बाब आहे .ठेकेदारांचे हित जपणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जणूकाही सफाई कर्मचाऱ्यांना मतदान वेळेस जाण्यासाठी केलेली ही कृती दिसून येते .त्यांच्या पगारासाठी निधीची तरतूद उपलब्ध असताना देखील केवळ क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकाऱयांच्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यासाठी विलंब लागत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन प्रमुख सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली .अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .या प्रकरणी दलित आदिवासी अधिकार आंदोलन संस्थेच्यावतीने ठेकेदारांकडून सफाई कामगारांचे पगार न दिल्याप्रकरणी पुणे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी सूचना करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रियदर्शी तेलंग यांनी दिली .
सोशल मिडीयावर व्यथा मांडल्यावर तीन महिन्यांचा पगार मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 9:33 PM
मी महापालिकेच्या ठेकेदारांकडील सफाई कर्मचारी असून तीन महिने मला पगार मिळाला नाही, आम्ही आजाराने नाही पण उपाशी राहू मरू. तरी मंत्र्यांनी आमचा पगार लवकरात लवकर द्यावा" अशी कैफियत पुण्यातील एका ठेकेदारांकडील सफाई कर्मचार्याने कुंटुबियांसह सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून मांडली. त्यानंतर प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत त्याचे वेतन दिले.
ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या ठेकेदारांकडील सफाई कर्मचार्याची दुर्दैवी गोष्ट पुणे महापालिकेच्या ठेकेदारांकडील सफाई कर्मचार्याची दुर्दैवी गोष्ट