पुणे : महापालिकेच्या वतीने मुदतीत मिळकत कर भरणाऱ्या करदात्यांसाठी सुरू केलेल्या विमा योजनेचा चांगलाच फायदा झाला असून, पहिल्या तीन महिन्यांतच शहरात तब्बल ५ लाख ९० हजार मिळकत करदात्यांनी ७४० कोटी रुपयांचा मिळकत कर भरला आहे. यामध्ये आॅनलाइन कर भरणाºयांची संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आहे; परंतु आता सवलतीची मुदत संपली असून, यापुढे कर भरणाºयांना २ टक्के दंड भरावा लागणार आहे.गेल्या आर्थिक वर्षांत महापालिकेच्या विविध विभागातून अपेक्षित उत्पन्न जमा न झाल्याने विकासकामांना कात्री लावण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त मिळकत कर जमा करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मिळकत कराच्या वसुलीसाठी विविध पथके तयार करून अपघात विमा योजना आणि ५ ते १० टक्के सूट यासारखे उपक्रम राबविले आहेत.चालू आर्थिक वर्षाच्या मिळकत कराची रक्कम ज्या मिळकत करधारकांनी भरलेली नाही, अशा मिळकत करधारकास पहिल्या सहा महिन्यांच्या रकमेस १ जुलैपासून दरमहा चक्रवाढ व्याजाने २ टक्के दंड आकारला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.विमा योजनेचा चार मिळकतदारांना लाभशहरातील रहिवासी असलेल्या आणि पालिकेचा मिळकत कर नियमित भरणाºया नागरिकांसाठी महापालिकेने अपघात विमा योजना जाहीर केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने ही विमा योजना राबविली जाणार आहे. शहरातील अधिकाधिक नागरिकांनी पालिकेचा मिळकत कर भरावा यासाठी; तसेच नियमित मिळकत कर भरणाºयांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत मिळकत करदात्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे; तसेच अपघातात अपंगत्व आल्यास त्या प्रमाणात भरपाई दिली जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत या विमा योजेनचा लाभ चार जणांना झाला आहे.शहरात एकूण ८ लाख ९० हजार मिळकतधारक आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये मिळकत कर विभागासाठी सुमारे १ हजार ८०० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील ५ लाख ९० हजार मिळकत धारकांनी ७४० कोटींचा मिळकत कर भरला आहे. त्यात आॅनलाइन कर भरणाºयांची संख्या ५२ टक्के असून, त्यातून ४०० कोटींचा मिळकत कर जमा झाला आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
तीन महिन्यांत ७४० कोटींचा मिळकत कर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:55 AM