शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 
2
महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव
3
नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; भाजपने कारवाई केली
4
HDFC Bank वर म्युच्युअल फंडांचा भरवसा नाय काय? ऑगस्टमध्ये विकले ₹८,२०० कोटींचे शेअर्स
5
तुमच्या वाहनावरील दंड माफ करायचाय? मग नॅशनल लोक अदालतीला भेट द्या; प्रक्रिया समजून घ्या
6
'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- "त्यांचं आयुष्य..."
7
अन् सनग्लासेस घालून बॅटिंग करणाऱ्या श्रेयसवर आली तोंड लपवण्याची वेळ; कारण...
8
तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र; नियमितपणे जप करा, अद्भूत लाभ मिळवा, शुभच होईल!
9
अमरावती आहे का? डेझी शाहच्या शेतातील फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, शिव ठाकरे म्हणतो...
10
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज बंपर तेजी; घेण्यापूर्वी चेक करा लेटेस्ट दर
11
BSNL चा 'हा' प्लॅन Airtel, Jio ला देईल धक्का; कमी खर्चात मिळेल ८२ दिवसांची व्हॅलिटिडी 
12
३ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: ‘असे’ करा व्रत, स्तोत्रांचे पठण; पाहा, पूजाविधी अन् महात्म्य
13
३ ग्रहांचे ३ राजयोग: १० राशींना फायदा, संचित संपत्तीत वाढ; नवीन नोकरीची संधी, पद-पैसा-लाभ!
14
'हे' देश आयुष्मान भारत सारख्या योजना चालवतात, जाणून घ्या, काय आहे खासियत...
15
यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले
16
अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील
17
"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा
18
अब तक १,०००,०००,०००! एवढे 'फॉलोअर्स' कमावणारा रोनाल्डो जगातील पहिला अन् एकमेव माणूस
19
एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला!
20
P N Gadgil ज्वेलर्सच्या IPO ला तुफान प्रतिसाद, आयपीओ लागला का नाही? 'असं' करा चेक

आॅनलाइन फसवणुकीच्या तीन घटना

By admin | Published: October 07, 2016 2:56 AM

आॅनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून, विविध आमिषे दाखवत तीन जणांना गंडवण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत

पुणे : आॅनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून, विविध आमिषे दाखवत तीन जणांना गंडवण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी, विमानतळ आणि मुंढवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात छाया प्रवीण अरोरा (वय ६८, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. अरोरा यांना राहुल शर्मा व त्याच्या चार साथीदारांनी मोबाईल तसेच लँडलाइनवर फोन करून एलआयसी हेड आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना गोल्डन फाईलमध्ये निवड झाल्याचे सांगत २0 लाख मिळणार असल्याची बतावणी केली. या रकमेसाठी वेळोवेळी विविध खात्यांवर १४ लाख ४५ हजार रुपये भरायला भाग पाडत फसवणूक केली. तर विमानतळ पोलिसांकडे प्रितीधारा साबत (वय २६, रा. कॅसल सोसायटी, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. साबत या खासगी कंपनीमध्ये संगणक अभियंता आहेत. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ई-मेल आयडीवरून इन्कम टॅक्स अकाऊंटचा पासवर्ड व गोपनीय माहिती परस्पर बदलून फसवणूक केली. तर रूपाली बाळकृष्ण शिंदे (वय ३५, रा. पवारवस्ती, मुंढवा) यांनी भारतीय किसान कॉलसेंटर विरुद्ध फिर्याद दिली आहे. या कॉलसेंटरद्वारे सीसीई पदासाठी भरती असल्याची जाहिरात देण्यात आली होती. शिंदे यांनी कॉलसेंटरमध्ये संपर्क साधल्यावर त्यांना नोकरी देण्याच्या आमिषाने खात्यावर वेळोवेळी ४६ हजार रुपये भरायला लावत फसवणूक केली.