शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

छत्रपती शिवाजी महाराजांची तीन शिवकालीन चित्रे प्रकाशात; इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांचं संशोधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 6:49 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अमूल्य ठेवा मिळाल्याने इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे.

पुणे : महाराष्ट्रापासून दूर परदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन समकालीन चित्रे संशोधकांना गवसली आहेत. ही चित्रे सतराव्या शतकातील असून भारतातील दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली व मिनिएचर प्रकारची आहेत. भारतात आलेल्या तत्कालिन युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ती युरोपमध्ये हस्तांतरित झाली व नंतर वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयात सुरक्षितपणे सांभाळून ठेवली गेली. या अप्रतिम कलाकृतींचा नजराणा असलेल्या शिवछत्रपतींच्या चित्रांचे संशोधन इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी केले आहे. 

प्रसाद तारे यांनी याबाबतची माहिती दिली. याप्रसंगी भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यवाह पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. तारे म्हणाले, शिवकाळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतुबशाहाची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या प्रदीर्घ मोहिमेवर गेले असताना ही चित्रे काढलेली आहेत किंवा त्या वेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इसवीसन १७०० पर्यंत काढलेली आहे.

पुढे तारे म्हणाले, या चित्रांच्या म्युझियम रेकॉर्डमध्ये ती चित्रे महाराजांची व सतराव्या शतकातील आहेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच ती दख्खनी गोवळकोंडा शैलीची आहेत असेही म्हटले आहे. त्यातील दोन चित्रांमध्ये पर्शियन व रोमन लिपीत महाराजांचे नाव चित्रांमध्ये लिहिलेले आहे. महाराजांव्यतिरिक्त अन्य अनेक भारतीय राजपुरुषांची चित्रे या वस्तुसंग्रहालयामध्ये आहेत  ही सर्व चित्रे नैसर्गिक रंग आणि सोने वापरून काढलेली आहेत. चित्रांचे चित्रकार अज्ञात आहेत.त्यातील एका चित्रासाठी पॅरिस येथील अभ्यासक शशी धर्माधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. 

चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर  खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार व पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी व गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे मोजकेच अलंकार त्यांनी धारण केलेले दिसून येतात. करारी मुद्रा, बोलके डोळे व चेहर्‍यावरचे स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्ये चित्रात देखील दिसून येतात असेही तारे यांनी यावेळी सांगितले..... 

चित्र १- जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील प्रस्तुत चित्रात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखविली आहे.

चित्र २ - पॅरिस येथील खाजगी वस्तुसंग्रहालयातील या चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र दाखविले आहे.

चित्र ३ - अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहातील या चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र व कमरेला कट्यार दाखविली आहे. युरोपमधून हे चित्र पुढे अमेरिकेत हस्तांतरित झाले.... छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अमूल्य ठेवा मिळाल्याने इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे. ही चित्रे समकालीन असल्याने त्यांचे ऐतिहासिक मूल्य खूप आहे. - पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक व अभ्यासक.  ... छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध सर्व शिवकालीन चित्रांवर सविस्तर वर्णनपर पुस्तक लवकरच प्रकाशित करत आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य असून त्यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित दोन शिवकालीन शिलालेखांचे शोध लावले आहेत. - प्रसाद तारे, इतिहास अभ्यासक 

.

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजpaintingचित्रकला