पिंपरी : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले.आरोपींकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दत्ता विठ्ठल आगलावे (वय २५, रा. वृंदावन कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड), विकास भाऊ कदम (वय २५, रा. औंढे खुर्द, लोणावळा), किरण दत्तात्रय येवले (वय २५, रा. वाकसई, लोणावळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुरुवारी चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात राहणारा गुन्हेगार दत्ता आगलावे हा मावळातील दोन गुन्हेगारांसोबत असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार दगडोबा चौक व चिंतामणी चौकात रात्री साडेदहा वाजता सापळा रचण्यात आला. त्यावेळी दोन दुचाकी येत असल्याचे आढळले. यातील पहिल्या दुचाकीवरील आगलावे ,कदम व येवले यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन दुचाकी असा ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने केली.
पिस्तूल बाळगणाऱ्या तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 8:40 PM
गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले.आरोपींकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ठळक मुद्देतीन गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन दुचाकी असा ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त