धनकवडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने शासनाने महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन जाहीर केल्याने हजारोंचा रोजगार हिरावला गेला आहे. त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
निरंजन बाळकृष्ण साळुंखे (वय ३५, रा. वर्धापन बिल्डिंग, वंडरसिटीजवळ) या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निरंजन हा वाहन चालक होता. गेल्या महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्याचा मित्र निरंजन याला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. तो मित्र शनिवारी रविवारी आला नव्हता. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला तेव्हा निरंजनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
पोपट पांडुरंग सलगर (वय ४०, रा. सुखसागरनगर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोपट याची दोन्ही मुले गावाला गेली आहेत. पत्नी कामाला बाहेर गेली होती. त्यामुळे तो एकटाच घरी होता. त्याचा मित्र सतत फोन करीत होता. मात्र, पोपट फोन उचलत नसल्याने मित्र घरी गेल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल अथवा ओळख पटले, असे कोणतीही वस्तू नव्हती, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांनी परिसरात एकच चर्चेचा विषय झाला आहे. ़़़़़़़़़मनाला उद्विग्न करणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र होते आहे. प्रत्यक्ष आत्महत्येची कारणे अनेक असली तरी बहुतेक घटनांमध्ये संबंधित व्यक्तीची वैफल्यग्रस्त मानसिक अवस्था हा महत्त्वाचा समान धागा आढळतो. अशा पीडितांना संवादाचा अभाव जाणवतो, मदत वेळेवर मिळत नाही, कोणाकडे मदत मागावी हे कळत नाही, मदत मागण्याचा कमीपणाही वाटतो. समाजामध्ये आत्महत्या करण्याचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. आत्यंतिक नैराश्याच्या पोटी केल्या जाणाऱ्या आत्महत्या प्रयत्नपूर्वक रोखायला हव्यात आणि त्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी.