फरार झालेला आरोपी कपिल कानसकर, प्रसाद दशरथ पाटे ( वय १९ ) रा. नारायणगाव , ता. जुन्नर , जि. पुणे यांच्या सह एक अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. १८ वर्ष पूर्ण होण्यास दोन महिने कमी वय असलेल्या अल्पवयीन मुलास बाल न्यायालयात हजर करून बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे . तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार आहेत .
ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार , जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचे नारायणगाव येथील निवास्थानावरील सुरक्षा रक्षक खंडेराव पिराजी पानसरे ( वय ३५ ) यास दिनांक २० एप्रिल रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास कपिल कानसकर व त्याचे साथीदार यांनी मारहाण केली आणि खिशातील २०० रुपये आणि कागदपत्रे घेऊन फरार झाले होते . या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . यापूर्वी गुन्ह्यातील आरोपी प्रसाद दशरथ पाटे यास अटक करण्यात आली होती, तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी कपिल कानसकर यास पोलिसांनी २४ एप्रिल रोजी पोलीस पथकाने अटक केली . या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे . या पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , जुन्नर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत .
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ व मारहाण प्रकरणात अटक केलेले दोन आरोपी आणि तपासी अधिकारी पृथ्वीराज ताटे सह पोलीस पथक .
Attachments area