धायरी (पुणे) :पुणे शहरामध्ये मेफेड्रॉन (एम.डी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघाजणांना अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्यामध्ये एकुण ४ लाख ९६ हजार रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी तालीब शकील अन्सारी (वय :२३ वर्षे, रा. घोरपडे वस्ती, कृपा हेरिटेज बिल्डींग,लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) आयान अल्ताफ बागवान (वय: १९ वर्षे, रा. भाग्योदयनगर नविन भट हॉस्पीटलजवळ कोंढवा खुर्द पुणे) वसिम आसिम सय्यद (वय: १९ वर्षे, फिजा क्लासिक, लेन नंबर १४, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द पुणे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हेशाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विशाल दळवी यांना बातमी मिळाली की, तीनजण शंकरशेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.