शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

लोणी स्टेशन परिसरात कमरेला पिस्तुल लावून फिरणाऱ्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:36 PM

एक गावठी पिस्तुल,आठ जिवंत काडतुसे व एक रिकामी मॅगझीन जप्त

ठळक मुद्देगावठी पिस्तुल बाळगण्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : लोणी काळभोरपोलिसांनी गावठी पिस्तुल बाळगण्याप्रकरणी लोणी स्टेशन परिसरातून तिघांना अटक केली.त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल,आठ जिवंत काडतुसे व एक रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी फिरोज महंमद शेख (वय२५.रा.घोरपडेवस्ती)आनंद महादेव चव्हाण (वय २३ रा.पठारेवस्ती,कदमवाकवस्ती आणि निलेश नागेश जेटीथोर (वय २२ रा.कदमवस्ती)या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन परिसरात फिरोज महंमद शेख हा त्याच्या दोन मित्रांसह कंबरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना बातमीदारामार्फत मिळाली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना याविषयी माहिती देऊन ननवरे  पोलीस पथकासमवेत लोणी स्टेशन परिसरातील हॉटेल प्यासाजवळ गेले असता त्याठिकाणी तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले.

यावेळी पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून झडती घेतली असता त्यातील फिरोज महंमद शेख याच्या पॅन्टचे डावे कंबरेस आतील बाजुस खोवलेला एक गावठी पिस्तुल व मॅगझीनमध्ये ५ जिवंत काडतुसे मिळून आली तर सोबत असलेल्या आनंद महादेव चव्हाण याकडे ३ जिवंत काडतुसे मिळून आली.हे गावठी पिस्तुल व काडतुसे यांनी निलेश नागेश जेटीथोर यानें दिले असल्याची माहिती फिरोज शेख व आनंद चव्हाण यांनी पोलिसांना दिली.यांच्याकडून गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे व एक मोकळे मॅगझीन असे एकुण २८,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पो.ना.परशराम सांगळे व लोकेश राऊत यांनी केली.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक