ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. ७६७ नाना पेठ, सध्या रा. मोहननगर, धनकवडी), कानिफनाथ विनोद महापुरे (वय २३, रा. २० नाना पेठ), राजन मंगेश काळभोर (वय २२, रा. मोहननगर, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला. याबाबत, १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणात अन्य ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. ही घटना २३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान नाना पेठ परिसरात घडली. फिर्यादी हा मित्रांसमवेत घराजवळ थांबला होता. आरोपी हे त्यांच्या साथीदारांसह त्याठिकाणी आले. त्यांपैकी महापुरे याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तर त्याच्या अन्य साथीदारांनी शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना मोका कोठडी देण्याची मागणी मोक्का विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना १८ मार्चपर्यंत मोका कोठडी सुनावली.