भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार: राजीव गांधी उद्यानासमोर एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली, त्याच्या जवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल अथवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही,
दुसऱ्या घटनेत निरंजन बाळकृष्ण साळुंखे (वय ३५, राहणार वर्धापन बिल्डिंग, वंडरसिटी) या तरुणांने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. निरंजन वाहन चालक होता. मागील महिन्यापासून तो बेरोजगार होता. त्याला त्याचा मित्र दररोज जेवणाचा डबा देत होता आज दुपारी तो डबा द्यायला आल्यावर ही घटना उघडकीस आली.
तिसऱ्या एका घटनेत सुखसागरनगर परिसरात एकटाच राहणाऱ्या पोपट पांडुरंग सलगर (वय ४०) या तरुणाने दोरीच्या साह्याने गळफास घेतला. पोपट यांची दोन्ही मुले गावाला गेली होती आणि पत्नी बाहेर कामाला गेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच होता, त्याला त्याचा मित्र सतत फोन करत होता. मात्र तो फोन उचलत नसल्याने मित्र घरी गेल्यावर आत्महत्येचा प्रकार दिसला. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.