या विवाह सोहळ्यास सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यात ज्येष्ठ नेते शरद पवार, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. यातील अनेकांनी मास्क घातले नव्हते. तसेच सोशल डिस्टंसिंगचादेखील फज्जा उडाला होता.
याप्रकरणी धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर व लाॅन्सचे मॅनेजर निरूपल केदार यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर परिसरात लक्ष्मी लॉन्स आहे. मोठमोठे विवाह सोहळे येथे पार पाडतात. रविवारी रात्री धनंजय महाडिक यांचा मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यासाठी नियम डावलून सुमारे बाराशे लोकांची गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शासनाने घालून दिलेल्या आदेशांचे पालन न करता सुमारे बाराशे लोकांची गर्दी जमवून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. तसेच अशा प्रकारे गर्दी जमवल्याने कोरोनाचा प्रसार होऊ शकतो याची जाणीव असूनही त्यांनी अशा प्रकारे गर्दी जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.