लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेण्याप्रकरणी एका महिलेसह दोन पुरुषांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली.सुषमा अजय ठाकूर (वय ३०, रा. सिद्धिविनायक पार्क, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी गाव), नितेश रणजित कुंजारभाट (वय ३५, रा. घोरपडी गाव, हनुमाननगर) आणि संदीप राजू भाट (वय २६, रा. घर नंबर ३२, गवळी चाळ जोसेफनगर, घोरपडी गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, संजय गिरमे, नितीन लोंढे, नितीन तेलंगे, राजेश उंबरे, संदीप गायकवाड, जयश्री जाधव, ननिता येळे, गीता जाधव, रूपाली चांदगुडे, समयंती जगदाळे आणि सचिन शिंदे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राज्यातील व परराज्यातील मुलींना वेश्या व्यवसायाकरिता ताब्यात घेऊन त्यावर आपली उपजीविका करतात अशी माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व्हे नं. ५३/२८ कन्हैय्या अपार्टमेंट फ्लॅट नं. ८ मध्ये छापा टाकला आणि दोन पीडित मुलींची सुटका केली. आरोपींविरूद्ध वानवडी पोलीस स्टेशन इटपा कायदा ३, ४, ५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: June 02, 2017 2:40 AM