शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विकृतीचा कळस! फुटपाथवर झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:10 PM

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का चौकात फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाच्या एका ३ वर्षाच्या मुलीला एकाने उचलून नेले़.  

पुणे : फुटपाथवर झोपलेल्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या मागील बाजूच्या फुटपाथवर हा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. दरम्यान, रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांमध्ये हद्दीच्या वादातून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का चौकात फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाच्या एका ३ वर्षांच्या मुलीला एकाने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचे डोके आपटून खून करण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशनच्या यार्डात थांबलेल्या एका रेल्वेच्या डब्यात या चिमुरडीला फेकून दिल्याचे आढळून आले. 

याबाबत हे कुटुंब सर्वप्रथम रेल्वे पोलिसांकडे गेले होते, मात्र, त्यांनी या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने ते रेल्वे सुरक्षा दलाकडे गेले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यावर एका डब्यात ही चिमुरडी आढळून आली. तिच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी चावे घेतल्याचे आढळून आले़. त्यांनी या मुलीला ससून रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. बंंडगार्डन पोलीस आणि पुणे गुन्हे शाखा यांना याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. 

पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकाजवळील भिंतीलगत 40 ते 50 भटक्‍या व विमुक्त समाजातील कुटुंबे पालांमध्ये वास्तव्य करतात. लिंबू, मिरची, खेळणी विकून उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये काही जण भिक्षेकरी आहेत. बारामती येथून भटक्‍या व विमुक्त प्रवर्गातील दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी पुणे स्टेशन येथे आले होते. संबंधित दाम्पत्य आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन मालधक्‍क्‍याजवळील पालांमध्ये वास्तव्य करीत आहे. दरम्यान मंगळवारी पहाटे दाम्पत्य त्यांच्या मुलीला जवळ घेऊन झोपले होते. पहाटे पाच वाजता अनोळखी व्यक्तीने मुलीला उचलून नेले. मुलीच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, सकाळी सात वाजता लोहमार्ग पोलिसांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालणाऱ्या लोहमार्ग पोलिसांना रेल्वेच्या डब्यामध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करुन तिच्या पालकांचा शोध घेतला. मालधक्का चौकात पोलिसांकडून चौकशी करताना मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे छायाचित्र ओळखले. मुलीवर उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

टॅग्स :Rapeबलात्कारSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसrailwayरेल्वे