त्या घटनेला तीन वर्षे होऊन गेली मी शपथविधिवर नाही म्हणजे नाहीच बोलणार; अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:12 PM2023-02-17T15:12:16+5:302023-02-17T15:12:27+5:30

मी देवेंद्र यांना विचारेन की, असे स्टेटमेंट या वेळी का केले?

Three years have passed since that incident I am not on oath I will not say no Ajit Pawar | त्या घटनेला तीन वर्षे होऊन गेली मी शपथविधिवर नाही म्हणजे नाहीच बोलणार; अजित पवार

त्या घटनेला तीन वर्षे होऊन गेली मी शपथविधिवर नाही म्हणजे नाहीच बोलणार; अजित पवार

googlenewsNext

पुणे : त्या घटनेला तीन वर्षे होऊन गेलीत. देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे माझ्या कानावर आले आहे; पण त्यावर मी आता नाही म्हणजे नाहीच बोलणार, अशा ठाम शब्दांत पहाटेच्या त्या वादग्रस्त शपथविधीचे उपनायक असलेल्या अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले.

पुण्यात शिवाजीनगरमधील संध्याकाळी झालेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांनी पवार यांना गाठले. त्यावेळी ते म्हणाले, देवेंद्र यांच्या बोलण्यावर मला काहीच बोलायचे नाही. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्याच्यावर काय होणार आहे का? मी देवेंद्र यांना विचारेन की, असे स्टेटमेंट या वेळी का केले? मी त्यांच्याशी बोललो नाही. यावेळी त्यांनी हे वक्तव्य का केले मला माहीत नाही. उद्या होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीला मी लागलेलो आहे. खासदार गिरीश बापट आज बाहेर पडले. ते आजारी आहेत. काल फडणवीस त्यांना भेटले. त्यांनी काही तरी सांगितले असेल. कसब्यातील वातावरणाबाबत काळजी व्यक्त केली असेल. त्यामुळेच आजारी असले, तरी त्यांनी मेळावा केला असे पवार म्हणाले. मनसेसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

जनतेचा कौल दाखविणारी निवडणूक...

मुळा, मुठा व पवना नदीसुधार प्रकल्पाचा केवळ आराखडा मंजूर झाला आहे. मात्र, कोणतेही काम पूर्ण झालेले दिसत नाही. झालेल्या कामांविषयी जनतेला काय वाटते, पुणेकर व पिंपरी-चिंचवडकर हे केंद्र, राज्य व महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का, याचा कौल दाखवणारी ही पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीचा निकाल आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट ठरणार आहे.

कसब्यातील नगरसेवक संख्या : १८

१) भाजप : १२
२) काँग्रेस : ०३
३) राष्ट्रवादी : ०२
४) शिवसेना : ०१

चिंचवडची नगरसेवक संख्या : ५३

१) भाजप : ३४
२) राष्ट्रवादी : ०९
३) शिवसेना : ०६
४) अपक्ष : ०४

Web Title: Three years have passed since that incident I am not on oath I will not say no Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.