शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 12:30 AM

अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पुणे : अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एन. के. मणेर यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात आहे.बंडू वसंत वाल्हेकर (वय २४, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना २0 फेब्रुवारी २0१६ रोजी पीडितेच्या घरात दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, फिर्यादी आणि तपास अधिकारी, अशा तिघांच्याही साक्ष यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या. पीडित मुलीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही १६४नुसार जबाब दिला होता.घटनेच्या वेळी फिर्यादी घरकामासाठी बाहेर गेल्या असताना बंडू त्यांच्या घरात घुसला. त्याने पीडितेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि ८ नुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.

टॅग्स :Molestationविनयभंग