शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

थरारक..! पूर्व वैमनस्यातून १५ जणांच्या टोळीचा एकावर गोळीबार व कोयत्याने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 2:25 PM

 पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या सराईत टोळक्यांनी एका सराईत गुंडावर गोळीबार करुन कोयत्याने वार केले.

ठळक मुद्देएकजण जखमी, चार जणांना अटक, १५ जणांवर गुन्हा दाखल 

पुणे  :चाकण येथे पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या सराईत टोळक्यांनी एका सराईत गुंडावर गोळीबार करुन कोयत्याने वार केले. संकेत रमेश गाडेकर ( वय २०, रा. खंडोबा माळ, चाकण ) असे पायाला गोळी लागून तसेच कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. ही घटना सोमवार ( दि.२७ ) रात्री अकराच्या सुमारास चाकणचा खंडोबा माळ येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास संकेत हा मित्रांसोबत खंडोबा माळ येथे गप्पा मारत बसला होता. यावेळी वरील सराईत टोळी हातात कोयता, पिस्तूल आणि काठ्या घेऊन आले. व जुन्या भांडणाच्या वादातून सोन्याने संकेतवर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या उजव्या पायाला लागली. तर राहुल माने याने संकेतवर कोयत्याने वार केले. या घटनेत संकेत गंभीर जखमी झाला असता हल्लेखोर पसार झाले.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सोन्या अवताडे, सोन्या आगरकर, रोहन घोगरे, मोनेश घोगरे, प्रतीक सोनवणे, विवेक कु?्हाडे, राहुल माने, रवि कळसकर, प्रशांत दातार (  सर्व रा. चाकण ) व स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे ( रा. रासे, ता.खेड ) आणि इतर चार ते पाच अनोळखी इसम असा १५ जणांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून अटक झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस