शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

स्टाफ सिलेक्शनमार्फत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:08 AM

बारामती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदाची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती ...

बारामती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदाची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत २५ हजार २७१ जागा भरण्यात येणार आहे. यासाठीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ जुलैपासून सुरु झाले आहे. ते ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक व महिला यांना परीक्षा शुल्क माफ आहे. या परीक्षेमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ७५४५, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफ ८४६४, सशस्त्र सीमा बल म्हणजेच एसएसबी ३८०६, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी १४३१, आसाम रायफल्स ३७८५, सेक्रेटेरियट सेक्युरिटी फोर्स म्हणजेच एसएसएफ २४० जागा अशा एकूण २५ हजार २७१ जागा भरल्या जाणार आहेत.

यामध्ये पुरुषांच्या २२ हजार ४२४ तर महिलांच्या २८४७ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवगार्साठी १८ ते २३ वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी १८ ते २८ वर्षे याशिवाय इतर मागास प्रवगार्साठी (ओबीसी) १८ ते २६ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. उंचीची पात्रता पुरुषांसाठी १७० सेंटिमीटर तर महिलांसाठी १५७ सेंटिमीटर इतकी आहे. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांची उंची १६२.५ सेंटिमीटर तर महिलांचे उंची १५० सेंटिमीटर इतकी आवश्यक आहे. पुरुषांच्या छातीचे मोजमाप घेतले जाते. यामध्ये छाती न फुगवता ८० सेमी. व ५ सेंमी. छाती फुगवता येणे आवश्यक आहे. तसेच उंची आणि वयाच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असणे आवश्यक आहे.

या पदांसाठीची लेखी परीक्षा १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून त्यासाठी ९० मि. इतका वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. ही लेखी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. यामध्ये सामान्य बद्धिमत्ता चाचणी व तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, गणित व हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण या ४ विषयांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. या शारीरिक क्षमता चाचणीत पुरुष उमेदवारांना ५ किमी अंतर २४ मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक आहे, तर महिला उमेदवारांना १.६ किमी. (१६०० मी.) अंतर ८ मिनिट ३० सेकंदांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.

या परीक्षेबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमी, बारामतीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, या पदांसाठी सुरुवातीला ऑनलाईन लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक पात्रता चाचणी, वैद्यकीय चाचणी व कागदपत्र पडताळणी अशा क्रमाने ही परीक्षा प्रक्रिया पार पडली जाणार असल्याचे रुपनवर म्हणाले.