वडगाव मावळ : मोटारीवर दगडफेक करून चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार जुना पुणे मुंबई महामार्गावरील कान्हेफाटा येथे गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास घडला. चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत मोटारीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाने प्रसंगावधान राखून मोटार वेगात पळविल्याने चोरीचा प्रयत्न फसला. मोटारचालक इलियस अब्दुल सत्तार (वय ४७ रा. विजापुर कर्नाटक), तखतसिंह धरमसिंह बालोत (वय ४०), अर्जुनसिंह तखतसिंह बालोत (वय ५) , देवीसिंह किसनसिंह परमार (वय २५), मनोहरसिंह जबरसिंह परमार (वय १८ चौघे रा. पादरली, ता.आहोर, जि.जालोर राजस्थान) हे विजापूर (कर्नाटक) येथून बुधवारी दुपारी दोनला राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते. चोरटे मोटारीचा पाठलाग करीत असतानाच चालक इलियस सत्तार यांनी प्रसंगावधान राखून मोटार वेगात पळविली.(वार्ताहर)
धावत्या मोटारीवर चोरट्यांची दगडफेक
By admin | Published: February 13, 2015 4:59 AM