शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Published: June 30, 2015 12:05 AM

पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन ठिकाणी घरफोडी करीत एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला.

मंचर : पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन ठिकाणी घरफोडी करीत एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत.काठापूर गावाच्या हद्दीतील भोकरवाडी येथे सदाशिव गणपत जगदाळे राहतात. ते व पत्नी घरासमोरील पडवीत झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी पडवीत येऊन या दाम्पत्यास मारहाण केली तसेच आवाज करु नका अशी धमकी दिली. दुसऱ्या खोलीत झोपलेले विलास व त्यांची पत्नी आशा यांना चोरट्यांनी मारहाण केली. बारकू जगदाळे यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला चोरट्यांनी बेदम मारहाण केल्याने उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. आशा जगदाळे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. आशा यांच्यावर पारगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.जाताना चोरट्यांनी दारासमोरील मोटारसायकलचा टायर तसेच पेट्रोलची टाकी फोडली. चोरट्यांनी रोहिदास मारुती शेटे यांच्या घराचा दरवाजा तोडला. शेटे यांनाही मारहाण करण्यात आली. शेटे यांना गप्प राहण्यास सांगून दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगण्यात आले. त्यांच्या घरातील रोख रक्कम चोरून नेण्यात आली.संदीप बबन करंडे यांच्या घरातही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केल्याची माहिती गोडसे यांनी दिली.