पुणे : शहरात गुरुवारी १७१ कोरोनाबाधित आढळून आले असून, १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ३२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.१२ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या आजमितीला १ हजार ६३७ सक्रिय रुग्ण आहेत, तर दिवसभरात आठजणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहाजण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्युदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८१ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २५६ इतकी आहे. आजपर्यंत शहरात ३३ लाख १४ हजार २४४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार ९५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ८९ हजार ३११ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ११ जणांचा मृत्यू झाला आहे.