पुणे : शहरात गुरूवारी २२२ कोरोनाबाधित आढळून आले असून, १०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ४८४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़़३४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ४७४ इतकी आहे. आज दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०४ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ५२ हजार ९५१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९६ हजार १०० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८४ हजार ६९१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाला आहे.